हुमा कुरेशी आपल्या वेगवेगळ्या अदांसाठी प्रसिद्ध आहे. चमकदार लेहेंग्यामध्ये तिने फोटोशूट केले आहे. यामध्ये हुमा फारच सुंदर दिसत आहे. सिल्व्हर आणि ग्रे कॉंबिनेशनच्या लेहेंग्यामध्ये ती दिसतेय. कानातील झुमक्यांनी तिच्या सौंदर्यात भर टाकली आहे. तिने यामध्ये आकर्षक हेअर स्टाईल केली आहे. हुमाच्या चाहत्यांना तिच्या अदा पसंत पडल्याचं दिसतंय. हुमाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून हुमाने वेगळीच छाप सोडलीय. डबल एक्स एल हा तिचा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे.