अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतो. सिद्धार्थनं नुकतेच त्याच्या 'कुल' लूकमधील फोटो शेअर केले आहेत. सिद्धार्थनं हे फोटो शेअर करुन आपला सिध्दू हा हॅशटॅग वापरला आहे. मल्टीकलर कोट आणि पँट, ब्लॅक शर्ट अशा लूकमधील फोटो सिद्धार्थनं शेअर केले आहेत. सिद्धार्थच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सिद्धार्थच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सिद्धार्थनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. गोलमाल, सिंम्बा या हिंदी चित्रपटांमध्ये सिद्धार्थनं काम केलं आहे. सिद्धार्थच्या जत्रा दे धक्का, 'दे धक्का-2' , जत्रा, खो -खो या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिद्धार्थचा होऊ दे धिंगाणा ही मालिका संध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.