'नॅशनल क्रश ऑफ इंडिया' म्हणून लोकप्रिय असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा आज वाढदिवस आहे. रश्मिकाने सौंदर्यासह अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रश्मिकाने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असतानाच रश्मिकाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'किरिक पार्टी' या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिकाने 2016 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 2021 साली आलेल्या 'पुष्पा' या सिनेमाने रश्मिकाला खऱ्या अर्थाने जगभरात लोकप्रियता मिळाली. रश्मिका मंदान्ना आज कोट्यवधींची मालकीण आहे. रश्मिकाची एकूण संपत्ती 45 कोटींपेक्षा अधिक आहे. रश्मिका दर महिन्याला 40 लाख कमवत असून तिची वर्षभराची कमाई पाच कोटींच्या आसपास आहे. रश्मिकाचं स्वत:चं आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत.