फिल्ममेकर अयान मुखर्जीनं (Ayan Mukerji) नुकतीच सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करुन 'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' (Brahmastra Part 2: Dev) आणि 'ब्रह्मास्त्र भाग 3' (Brahmastra Part 3) ची टाइमलाइन जाहीर केली.



'ब्रह्मास्त्र भाग 2: देव' हा चित्रपट 2026 मध्ये तर 2027 मध्ये 'ब्रह्मास्त्र भाग 3' रिलीज केला जाईल असंही त्यानं या पोस्टच्या माध्यामतून चाहत्यांना सांगितलं.



अयाननं त्याच्या पोस्टमध्ये एका 'स्पेशल' चित्रपटाचा देखील उल्लेख केला आहे. हा चित्रपट कोणता आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.



अयाननं पोस्टमध्ये लिहिलं, 'द युनिव्हर्सने मला एक खास संधी दिली आहे. एका स्पेशल चित्रपटाचे दिग्दर्शिन करण्याची संधी मला मिळत आहे. चित्रपटाबद्दल मी योग्य वेळ आली की सांगेन. '



आदित्य चोप्रा हे वॉर 2 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अयानला देणार आहेत, असं म्हटलं जात आहे.



अयानचा 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा 2022 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता.



अयानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं.



वेक अप सिड, ये जवानी है दिवानी या चित्रपटांचं अयाननं दिग्दर्शन केलं आहे.



अयानच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.