दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने इंस्टाग्रामवर आपलं खातं उघडलं आहे. विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इंस्टाग्रामवर एन्ट्री करताच थलापती विजयचे अवघ्या काही तासांत 40 लाख फॉलोअर्स झाले आहेत. थलापती विजयने इंस्टाग्रामवर पदार्पण करत 'नमस्कार मित्रांनो' असं म्हणत एक खास पोस्ट केली आहे. थलापती विजय इंस्टाग्रामवर येताच ट्वीटवर '#ThalapathyOnINSTAGRAM' हे ट्रेडिंगमध्ये आहे. थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. थलापती विजयचे कोट्यवधी चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या सिनेमात थलापती विजयची झलक पाहायला मिळणार आहे. थलापती विजयचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलापती विजयच्या 'वरिसु' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा गल्ला जमवला आहे.