हिंदी सिनेसृष्टीसह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या 'सिटाडेल' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी 'देसी गर्ल'ने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केलं होतं.
आता 'सिटाडेल'च्या प्रमोशनसाठी प्रियंका भारतात आली असून बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर तिने अखेर मौन सोडलं आहे.
प्रियंकाने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं.
बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्रा म्हणाली,बॉलिवूडमधील राजकारणाचा मला कंटाळा आला तेव्हा मी 20 वर्षांची होते आणि त्यावेळी या विषयावर जाहिररित्या बोलण्याची माझ्यात हिंमत नव्हती.
प्रियंका पुढे म्हणाली,आज मी स्वत:ला सिद्ध केलं असून आज या विषयावर मी बोलू शकते. बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल मी फक्त सत्य सांगितलं आहे.
प्रियंकाची 'सिटाडेल' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'देसी गर्ल'चा 'लव्ह अगेन' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमातदेखील प्रियंका चोप्रा झळकणार आहे.
प्रियंका चोप्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.