पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिची फॅन फॉलोईंग चांगलीच आहे. तिचे बोलके डोळे आणि तिची स्माईल आणि तिचं एकंदरीत सौंदर्य चाहत्यांना घायाळ करून टाकतं. पुष्पाच्या यशानंतर रश्मिका चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. रश्मिकाशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. रश्मिकाचे मनमोहक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच भावतात. तिचे सुंदर फोटो पाहून चाहते तिच्या बालिशपणाचे आणि सौंदर्याचे तोंडभरू कौतुक करत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने रश्मिका मंदान्नाची लोकप्रियता खूपच वाढवली आहे. आधी रश्मिकाचा डंका फक्त दक्षिणेतच होता, तो आता बॉलिवूडमध्येही वाजत आहे.