रिमी सेन सध्या चित्रपटांपासून दूर असून ती राजकारणात सक्रिय झाली आहे. रिमी सेनने 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिमी सेन हिने आता भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रिमी सेन ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गोलमाल, हंगामा, दिवाने हुए पागल, धूम 2, फिर हेरा फेरी यांसारख्या चित्रपटांत रिमीने काम केले आहे. रिमी सेन बिग बॉस 9 ची स्पर्धकही राहिली आहे रिमी गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त काळापासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सोशल मीडियावरून रिमीच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती दिली आहे. सध्या ती राजकारणात नशीब आजमावत आहे. उत्तराखंडमध्ये ती भाजपची स्टार प्रचारकही होती.