बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमच्या 'ए थर्सडे' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. तसेच सिनेमाचा ट्रेलर गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये केकपासून ते जेवणापर्यंत अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच बालवडीतल्या मुलांना यामी 'ट्विंकल-ट्विंकल' ही कविता शिकवताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये यामीचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. यामी गौतमची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात थरार नाट्य असणार आहे.