अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हणून ओळखली जात होती.
अनेक वेळा हे दोघे पार्ट्या आणि इतर कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत असत. परंतु, सद्यस्थितीला मलायका आणि अरबाज एकत्र नाहीत. 2017 मध्ये लग्नाच्या 19 वर्षानंतर अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोट घेऊन त्यांच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
घटस्फोटानंतर काही दिवसांनी मलायका मैत्रीण करीना कपूरच्या चॅट शोला गेली होती. यावेळी तिने आपल्या घटस्फोटाबाबत सांगितले होते. यावेळी मलायकाने हे पण सांगितले की, घटस्फोटाबाबत घरी सांगितल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रीया काय होत्या.
मलायकाने सांगितले की, ती आणि आरबाज त्यांच्या वैवाहित आयुष्यात आनंदी नव्हते.
घटस्फोट घेण्याच्या एक दिवस आधीपर्यंत घरातील लोक हेच विचारत होते की, घटस्फोट घेण्याचा निर्णय पक्का झाला आहे का?
अरबाजसोबतच्या तिच्या नात्यातील वाईट टप्प्याची आठवण करून देताना मलायका म्हणाली की, ते दोघेही एकत्र राहून आनंदी नव्हते आणि यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता.
अखेर 2017 मध्ये 19 वर्षांचा संसार मोडत दोघे जण वेगळे झाले.
मलायका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.