कालच्या सामन्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात राशिद खानच्या भेदक माऱ्याच्या जोरावर गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला.
माफक 144 धावांचा बचाव करताना गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
राशिदनं शानदार गोलंदाजी करताना चार विकेट्स घेतल्या.
त्यानं संदिप लामिछानेचा विक्रम मोडला आहे.