बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. तसेच, आपले क्लासी फोटोही शेअर करत असते. अभिनेत्री तारा सुतारियानं काही ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. गोल्डन ड्रेसमधील ताराच्या फोटोंवर चाहते भलतेच घायाळ झाले आहेत. गोल्डन बॉडीकॉन ड्रेसमध्ये तारा सुतारिया क्लासी दिसतेय. तारा सुतारियानं 'हिरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर केली होती. तारा लवकरच 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये अर्जुन कपूर, जॉन इब्राहिम आणि दिशा पाटनीसोबत दिसून येणार आहे. ताराच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. ताराने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तारा तिच्या स्टायलिश अंदाजासाठीही ओळखली जाते.