पॅटने यंदाच्या आय़पीएलमध्ये लगावलेल्या एका तुफान अर्धशतकामुळे सर्वाधिक स्ट्राईक रेटने रन बनवणारा खेळाडू तो बनला आहे. पॅटने 262.50 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आहे. त्याने पाच सामन्यात केवळ 24 चेंडू खेळत 63 धावा केल्या आहेत. पॅटनंतर या यादीत नंबर लागतो तो म्हणजे भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा. दिनेशने देखील यंदा 200 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. त्याने 12 सामन्यातीस 12 डावात 8 वेळा नाबाद राहत 137 चेंडूत 274 रन बनवले आहेत. गुजरात टायटन्स संघाचा विचार करता त्यांचा ऑलराउंडर राशिद खान या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे. त्याने सीजनच्या 11 सामनन्यात 38 चेंडूवरवर 72 रन केले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 189.47 इतका राहिला आहे. या यादीतील चौथं नाव आहे वॉशिंगटन सुंदरचं असून त्याने केवळ 4 डाव खेळत 63 रन बनवले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 185.29 आहे. या टॉप-5 फलंदाजामध्ये पंजाब किंग्सचा लियाम लिव्हिंगगस्टोन असून त्याने 11 सामन्यात 171 चेंडूत 315 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 184.21 इतका राहिला आहे.