दोडक्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे आपली डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.
मुळव्याधीच्या त्रासावर शिरोळ्याची भाजी खाल्ली तर आराम मिळतो.
दोडक्याच्या भाजीतून लहान मुलांना कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन सी, ए या प्रकारची खनिजे चांगल्या प्रमाणात मिळतात.
दोडक्यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम चे प्रमाणही चांगले राहण्यास मदत होते, त्यामुळे हाडे बळकट व मजबूत राहतात.
दोडका रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो त्यामुळे ज्या व्यक्तींना डायबिटीज असेल त्यांनी दोडक्याची भाजी खाल्ली पाहिजे.
शिरोळ्याच्या भाजीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण हे चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे बीपी ची समस्या नियंत्रित राहण्यास मदत होते.
शिरोळ्यामुळे आपल्या शरीरातील हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहते, हृदयाचे विकार होत नाहीत.
शिरोळ्याची भाजी सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य हे बाहेर निघण्यास मदत होते.
शिरोळ्याची भाजी सेवन केल्यामुळे आपल्या शरीराचे वजन हे नियंत्रित राहते.
शिरोळ्याची भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची पचनक्रिया ही वाढण्यास मदत होते.