अभिनेता रणवीर सिंह हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनं जिंकतो.
बँड बाजा बरात या चित्रपटातून रणवीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
रणवीरनं नुकतीच Marrakech International Film Festival मध्ये हजेरी लावली.
मोरक्कोमध्ये या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं.
Marrakech International Film Festival मध्ये Etoile d'Or पुरस्कारानं रणवीरला सन्मानित करण्यात आलं. या इव्हेंटमध्ये रणवीरनं एक अनुभव चाहत्यांना सांगितला.
रणवीरनं इव्हेंटमध्ये त्याच्या बॉलिवूड जर्नीबाबत सांगितलं.
'एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये मला बोलवलं होतं. या पार्टी दरम्यान त्या निर्मात्यानं एक कुत्रा माझ्या मागे सोडला.' असं रणवीरनं कार्यक्रमामध्ये सांगितलं.
12 वर्ष रणवीर अभिनय क्षेत्रात काम करत आहे.
रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 या सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं.
रणवीर लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.