अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या मनमोहक सौंदर्यासाठी ओळखली जाते. हंसिका तिचा स्टायलिश अंदाज आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. ह्रतिक रोशनच्या 'कोई मिल गया...' चित्रपटामध्ये अभिनेत्री हंसिका मोटवानी बाल कलाकार म्हणून झळकली होती. अभिनेत्री हंसिकाने हिंदी सिनेसृष्टीसोबतच अनेक तामिळ आणि तेगुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. निरमा सौंदर्य साबणाचा जाहिरातीमुळेही हंसिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. हंसिकाचा जन्म 9 ऑगस्ट 1991 रोजी झाला असून ती सध्या 31 वर्षांची आहे. हंसिकाचा जन्म मुंबईतील एका सिंधी कुटुंबामध्ये झाला. तिचं शिक्षणही मुंबईत झालं आहे. 'शका लका बूम बूम' या मालिकेतून हंसिकाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. 2007 साली आलेल्या 'देसमुदुरु' या तेलगू चित्रपटामधून तिने नायिका म्हणून डेब्यू केला. हंसिका अभिनेत्री असण्यासोबत एक सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. चाहते तिच्या स्टाईचे वेडे आहेत. हंसिका नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.