दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडवर छाप सोडलीय. दीपिका ही यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. अॅक्टिंगची राणी असली तरी ती तिचं शिक्षण पूर्ण करु शकली नाही. दीपिका मूळची बंगळुरुची आहे. बंगळुरुच्या सोफिया हायस्कूलची ती विद्यार्थिनी आहे. बंगळुरुच्या माऊंट कार्मल कॉलेजमध्ये ती शिकायला होती. पण मॉडेलिंगची ऑफर मिळताच तिने शिक्षण अर्धवट सोडलं. त्यानंतर पदवी पूर्ण करण्यासाठी तिने इग्नूमध्ये प्रवेश घेतला. पण या ठिकाणीही ती पदवी घेऊ शकली नाही. अभिनयाव्यतिरिक्त दीपिकाला बॅडमिंटन पसंत आहे.