छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'कुलवधू', 'अदालत', 'छूना है आसमान' सारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दलजीतने काम केलं आहे. दलजीत कौरचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांमध्ये ती पंजाबची हेमा मालिनी म्हणून लोकप्रिय आहे. 'बिग बॉस 13'मुळे दलजीत कौर घराघरांत पोहोचली. पण खेळ चांगला खेळत नसल्यामुळे तिला लवकर घराचा निरोप घ्यावा लागला. 'कुलवधू' मालिकेच्या शूटिंगदरम्यान दलजीतचे नाव शालिन भनोटसोबत जोडले जाऊ लागले. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर दलजीत आणि शालिन लग्नबंधनात अडकले. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. दलजीत कौर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. 'मानो या न मानो', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'मां शक्ति', 'कयामत की रात' आणि 'काला टीका' अशा अनेक मालिकांमध्ये दलजीतने काम केलं आहे. छोट्या पडद्यावर दलजीतने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण खासजी आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. अभिनयासोबत दलजीत कौर फिटनेसकडेदेखील चांगलं लक्ष देते.