दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) हे लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत, असं म्हटलं जात आहे.



एका मीडिया रिपोर्टनुसार, राम चरण हा शाहरुखच्या जवान (Jawan) या आगामी चित्रपटामध्ये कॅमिओ करणार आहे.



जवान या शाहरुखच्या आगामी चित्रपटामध्ये राम चरण छोटी पण महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे.



जवान या चित्रपटामध्ये राम चरण आणि शाहरुख पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत, अशी चर्चा आहे.



जवान चित्रपटाच्या मेकर्सनं सुरुवातीला या चित्रपटामधील कॅमिओ रोलची ऑफर थलापती विजय आणि अल्लू अर्जुन यांना देण्यात आली होती. पण आता राम चरण हा जवान चित्रपटात काम करणार आहे, असं म्हटलं जात आहे.



राम चरणचा आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.



आता जवान या चित्रपटात राम चरणला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.



राम चरणचा चाहता वर्ग मोठा आहे.



राम चरणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.



राम चरण हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.