जान्हवी कपूरचा आज 26 वा वाढदिवस आहे.



जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.



2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या धडक या चित्रपटामधून जान्हवीनं अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.



जान्हवीच्या लूक्स, स्टाईल आणि अभिनयामुळे तिचा चाहता वर्ग मोठा आहे.



आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...



जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. 2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे.



जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते.



तिचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत.



गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे.



जान्हवीचा दोस्ताना-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.