बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते पियुष मिश्रा हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.



पियुष मिश्रा यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सला लोक गर्दी करतात.



सध्या पियुष मिश्रा हे त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकामुळे चर्चेत आहेत.



'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकामध्ये पियुष यांनी त्यांना आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल लिहिलं आहे.



'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकामध्ये पियुष यांनी एका अत्यंत धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे.



पियुष यांनी पुस्तकात लिहिलं की, ते इयत्ता सातवीमध्ये असताना एका महिला नातेवाईकाने त्यांचे लैंगिक शोषण केले.



सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन पियुष मिश्रा यांनी त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा' या पुस्तकाची माहिती दिली.



पुस्तकाचा फोटो शेअर करुन त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हे पुस्तक तुमच्यासाठी, हे माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. जे माझ्या मनात बालपणापासून होते, ते मी यामध्ये मांडले आहे. अनेक किस्से आणि गोष्टी यामध्ये आहेत. '



2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल’ या चित्रपटात पियुष यांनी काम केलं.



पियुष मिश्रा यांनी गुलाल, गैंग्स ऑफ वासेपूर यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं.