बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना वेगवेगळे किस्से सांगत असतात.



अमिताभ बच्चन यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे.



अमिताऊ बच्चन यांनी त्यांच्या या ब्लॉगच्या माध्यमातून सांगितलं की, त्यांना शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे



प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत आहेत.



शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान बिग बी यांना गंभीर दुखापत झाली.



हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करत आहेत.



अमिताभ बच्चन यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर अनेकांनी बिग बींच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.



बिग बींनी ब्लॉगमध्ये लिहिलं, 'हैद्राबादमध्ये मी प्रोजेक्ट के या चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी अॅक्शन सीन शूट करत असताना मी जखमी झालो.



प्रोजेक्ट के या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि प्रभास (Prabhas) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.



अमिताभ बच्चन यांचा प्रोजेक्ट के हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.