बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे आपल्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.



अनुपम खेर यांचा आज 68 वा वाढदिवस आहे.



अनुपम खेर यांचा जन्म 7 मार्च 1955 रोजी शिमला येथे झाला.



अनुपम खेर यांनी जवळपास 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.



अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जेव्हा अनुपम हे मुंबईमध्ये आले, तेव्हा त्यांना संघर्ष करावा लागला.



अनुपम हे खिशात केवळ 37 रुपये घेऊन ते मुंबईमध्ये आले होते.



सारांशनंतर 'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले.



रिपोर्टनुसार, अनुपम हे 400 कोटींच्या संपत्तींचे मालक आहेत.



मुंबईमध्ये त्यांचे दोन बंगले आहेत. तसेच त्यांच्याकडे काही लग्झरी गाड्या देखील आहेत.



अनुपम खेर यांचा चाहता वर्ग मोठा आहे.