भिनेता ऋषभ शेट्टीचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ऋषभ शेट्टीच्या टीमनं कांतारा (Kantara) चित्रपटाच्या प्रीक्वेलचं (Prequel Of Kantara) कथानक लिहायला सुरुवात केली आहे.
कांतारा-2 (Kantara-2) या चित्रपटाबद्दल ऋषभनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली.
होम्बले फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसनं ट्विटर अकाऊंटवर एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये लिहिलं, नवीन वर्षाच्या या शुभ मुहूर्तावर, आम्हाला हे कळवताना आनंद होत आहे की, कांताराच्या दुसऱ्या भागाचे लेखन सुरू झाले आहे'
ऋषभ शेट्टीनं कांतारा-2 बाबत लिहिलं, कांताराच्या रायटिंगला सुरुवात त्याच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'कांतारा' हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.
अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेला ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या साऊथच नव्हे तर, हिंदीमध्येही हिट ठरला.
'कांतारा' चित्रपटात अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले.
आता कांतारा-2 मध्ये कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.