बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत समावेश आहे. सध्या तिचे लेटेस्ट फोटोशूट सध्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. ब्लॅक आउटफिटमध्ये रकुल प्रीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तसेच, या लूकमध्ये ती तिचे टोन्ड लेग फ्लाँट करत आहे. रकुल प्रीत हलका मेकअप आणि डायमंड इअरिंग्जमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. या नव्या फोटोंमध्ये, रकुल प्रीत सिंहने काळ्या रंगाचा ओपन फ्रंट ड्रेस परिधान केला आहे. रकुल प्रीत सिंहच्या या फोटोंमध्ये तिचा लूक खूपच किलर दिसत आहे. रकुल प्रीत सिंहचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यासोबतच रकुलच्या या फोटोंवर फॅन्सही भरभरून लाईक्स करत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत नुकतीच अजय देवगणसोबत ‘रनवे 34’ आणि जॉनसोबत ‘अटॅक’ या चित्रपटात दिसली होती. ती लवकरच अक्षय कुमारसोबत ‘कटपुतली’मध्ये दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या आगामी 'थँक गॉड' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजय पुन्हा एकदा देवगणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.