अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. अल्पावधीत पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. पूजा सावंत मराठमोळी अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'लपाछपी' सिनेमातील तिच्या अभिनयासाठी तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला. पूजा सावंतचा 'दगडी चाळ 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमात पूजाने साकारलेली कलरफुल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे.