बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या 'रक्षा बंधन' या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. खिलाडी कुमारचा या वर्षात प्रदर्शित होणारा हा तिसरा सिनेमा आहे. अक्षय सध्या 'रक्षा बंधन' सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 'रक्षा बंधन' सिनेमाने बॉक्स ऑफिस चांगला गल्ला जमवावा यासाठी अक्षय अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. 'रक्षा बंधन' या सिनेमात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या माध्यमातून अक्षय आणि भूमीची जोडी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. 'रक्षा बंधन' सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहे.