सौंदर्यवती हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकून देशाचं नाव उंचावलं. पण मिस युनिव्हर्स बनल्यापासून हरनाज तिच्या लूकमुळे चर्चेत असते. हरनाजचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून आश्चर्य वाटेल. मिस युनिव्हर्स हरनाज संधूने ग्लॅमरस अंदाजात नवीन फोटोशूट केलं आहे. हरनाजच्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हरनाजचा लूक पाहून काही आश्चर्यचकित झाले तर अनेकांना तिची स्टाईल आवडली. या फोटोशूटमध्ये हरनाज ब्लॉण्ड हेअरमध्ये दिसत आहे. हरनाजने ब्लॉण्ड हेअरला हरका कुरळा लूक देऊन केस खुले ठेवले आहेत. या लूकमध्ये हरनाज खूपच जबरदस्त दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची पोज किलर आहे.