अभिनेत्री ईशा रेब्बो सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ईशाने अलिकडेच तिचे काही फोटो ईन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'अंतका मुंडू आ तरवथा' नंतर ईशाने 'बंदिपोटू', 'माया मॉल' आणि 'आमी तुमी' आणि 'ओई' सारख्या अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 2016 मध्ये ईशाने 'ओई' चित्रपटातून तमिळ चित्रपटांमध्ये पदार्पण केले. दक्षिण आफ्रिकेत आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवात ईशाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. ईशाने तिच्या करिअरची सुरुवात 2013 मध्ये साऊथ चित्रपट 'अंतका मुंडू आ तरवथा'मधून केली होती. या चित्रपटाने जबरदस्त यश मिळवले, ईशाला या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट तेलुगु पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला होता. ईशाला VBEntertrainments Vendithera द्वारे ब्युटी ऑफ द इयर 2019 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये ईशाला पुन्हा 'आमी तुमी'साठी झी अप्सरा कडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ईशाचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.