तिने 'बिग बॉस 15' मध्ये पती रितेशला जगासमोर आणून सर्वांना आश्चर्यचकित केले.
यादरम्यान दोघांचे लग्न कायदेशीर नसल्याचे अनेक खुलासे झाले.
'बिग बॉस 15' हा शो आता संपला आहे आणि नंतरही राखी अनेकदा पती रितेशसोबत स्पॉट झाली आहे.
मात्र, आता राखीने रितेशशी अधिकृतपणे लग्न करणार नसल्याचे म्हटले आहे. यासोबतच तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राखी सावंतने ई-टाइम्सशी बोलताना सांगितले की, ‘मी रितेशसोबत खूप आनंदी आहे.
माझ्या पतीवरचे सर्व आरोप खोटे आहेत, हे मला माहीत आहे. त्याच्याबद्दल जे सांगितले जात आहे, तसा तो अजिबात नाही.
मी आता काही काळ त्याच्यासोबत आहे आणि मी त्याला चांगले ओळखते. तो बेल्जियमहून आला आणि त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाला. त्याने मला खूप प्रेम दिले आहे.