भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी वयाच्या 93व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला, ज्यानंतर सायंकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लतादिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गज मंडळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील थेट मुंबईत पोहोचले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच पत्नी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या.