भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.



यावेळी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट मुंबईत पोहोचले होते.



नरेंद्र मोदी यांनी लतादिदींचं अखेरचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित काही मोजक्या व्यक्तींची भेट देखील घेतली.



आपल्या व्यस्त वेळापत्रकात बदल करत मोदीजी लतादिदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी याठिकाणी उपस्थित होते.



नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबीयांचं सांत्वन देखील केलं.



लतादीदींच्या निधनाने देशात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते. असंही मोदी यांनी नमूद केलं आहे.



नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.