पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला पाहिजे.
पिवाळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. एखाद्या व्यक्तीची तुम्हा आठवण येत असेल किंवा ज्या व्यक्तीसोबत तुमचे प्रेमाच्या आलिकडचे आणि मैत्रीच्या पलिकडचे नाते असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा गुलाब त्या व्यक्तीला देऊ शकता.
नारंगी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. नारंगी रंगाच्या गुलाबा देऊन तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता.
लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे. जर तम्ही तुमच्या पार्टनरवर प्रेम करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर तुम्ही त्यांना लाल रंगाचे गुलाब दिले पाहिजे.
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आहे. 'व्हॅलेंटाईन वीक' आणि 'व्हॅलेंटाईन डे' ला कपल एकमेकांना गिफ्ट्स देतात.
आज रोज डे आहे. बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात.
जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.