राखी सावंत तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं मांडते. राखी विविध शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. राखीने काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केले. राखीच्या आईची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडली आहे. राखीचा गर्भपात झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. फोटोग्राफर विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. विरल भयानी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमुळे राखीचा खरंच गर्भपात झाला आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना या पोस्टमुळे पडत आहे. बिग बॉस-14, नच बलिये, बिग बॉस- 15 आणि बिग बॉस मराठी-4 या कार्यक्रमांमधून राखी प्रेक्षकांच्या भेटीस आली. राखी तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते.