मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नुकतेच मृणालनं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक प्रिंटेड फ्रॉक आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये मृणाल दिसत आहे. मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अभिमन्यू दसानी, विशाल सिंह, अमोल पराशर यांनी मृणालच्या फोटोला कमेंट्स केल्या आहेत. मृणालच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले. मृणाल ही नानी-30 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.