फॅन्ड्री आल्यानंतर शालू म्हणजेच राजेश्वरी खरात चांगलीच चर्चेत आली



फॅन्ड्रीमध्ये जब्या आणि शालूची लव्हस्टोरी मोक्कार गाजली.



साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं.

आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.



शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे

'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.


राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.



सध्या शालू अर्थात राजेश्वरीनं फेसबुकवर टाकलेला एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.



यात तिनं निळी साडी घातली आहे. यावर एका गाण्यावर डान्स करताना ती दिसत आहे.'मैं दिवानी बन गई' या गाण्यावर ती डान्स करतेय.


तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. (फोटो-राजेश्वरी खरातच्या व्हिडीओतून)