नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे



आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते



विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे



घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो, अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चावून चघळून खावीत. त्यामुळे घसा, कंठ साफ होतो



डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळणे अशा सर्दीमध्ये विड्याची दोन पाने, चहाची पाती, धणे, आले, मिरी यांचा काढा तयार करावा



विड्याच्या पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही काही विड्याची पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा.



आता त्यात 2 चिमूटभर हळद आणि कोरफडीचे जेल मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा धुवा. पिंपल्स कमी होऊ लागतील.



डाग घालवण्यासाठी विड्याच्या पानाचाही वापर करता येतो. मात्र, तुमची त्वचा अधिक संवेदनशील असल्यास हे वापरू नका.



विड्याची पाने सुकवून पावडर बनवू शकता. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी एक चमचा पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.