अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर देशभरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

हवामान विभाच्या माहितीनुसार, आज राजधानी दिल्लीत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर, अंदाजानुसार, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यानंतर साधारणपणे 23 ऑगस्टच्या दरम्यान हवामानात थंडावा असेल.

दिल्लीत आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश राहण्याचा अंदाज आहे.

राजस्थानमध्ये 16 ऑगस्टपासून हलक्या पावसामुळे वातावरण आल्हाददायक आहे.

येत्या काही दिवसांत पूर्व राजस्थानच्या काही भागांत मान्सून सक्रिय होण्याची दाट शक्यता असून,

त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो

IMD नुसार राज्यात 20 आणि 21 ऑगस्ट रोजी रिमझिम पाऊस पडू शकतो.

याशिवाय पुढील आठवड्याभरात वातावरणात फारसा बदल नसेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.