इस्रोच्या चांद्रयान-3 नं चंद्राचे फोटो पाठवले आहेत. जवळून चंद्राचा पृष्ठभाग कसा दिसतो, हे फोटो पाहून तुम्हाला कळेल.



इस्रोचं चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणासह चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं.



लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतर चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे.



हा फोटो लँडर इमेजरने टिपला आहे. हा फोटो विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरा-1 ने 17 ऑगस्ट रोजी कैद केला आहे.



चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरने अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढले असून ते इस्रोला पाठवले आहेत.



यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.



भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची चंद्र मोहिम आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहे.



चांद्रयान-3 चा विक्रम लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचलं असून आता याचा वेग कमी-कमी होत जाईल.



त्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.



चांद्रयान-3 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता अवकाशात झेपावलं. चांद्रयान-3 अंतराळयान 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.