काँग्रेस खासदार राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत. ते बाईकवरुन पँगाँग लेक इथे पोहोचले.

राहुल गांधी यांच्या लडाख दौऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये राहुल गांधी बाईक चालवताना दिसत आहेत.

राहुल गांधींचा हा अंदाज पहिल्यांदाच पाहायला मिळालेला नाही. याआधी त्यांनी बाईक दुरुस्त करताना, शेतात काम करताना दिसले आहेत.

फोटो शेअर करताना राहुल गांधी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

लडाख प्रवासादरम्यान राहुल गांधी कारगिल स्मारकाच्या ठिकाणी जाणार आहेत.

20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती ते लडाखच्या पँगाँग लेकवर साजरा करणार आहेत.

तर 25 ऑगस्ट रोजी 30 सदस्यीय स्वायत्त पहाडी विकास परिषद कारगिल निवडणुकीच्या बैठकीत सहभागी होतील.

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनेही कारगिर परिषद निवडणुकीसाठी भाजपविरोधात आघाडी स्थापन केली आहे.



एकेकाळी लडाख हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मागील काही वर्षात भाजपने इथे काँग्रेसला रोखलं आहे.

त्यात आता राहुल गांधी पुन्हा एकदा लडाखमध्ये सक्रिय होऊन जनतेचं मन जिंकू पाहत आहेत