निवडणुकांच्या निकालानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी चार राज्यांच्या निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी तेलंगणाच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. आमच्या विचारधारेची लढाई सुरुच राहिल. मी तेलंगणाच्या जनतेचा खूप आभारी आहे. तेलंगणामध्ये विकास करण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.