तीन राज्यात भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे