राहुल गांधी आज शेतात भाताची लागवड करताना दिसले.



हरियाणातील सोनीपतमधल्या मदिना गावात राहुल गांधी शेतात राबताना दिसले.



हरियाणातील सोनीपत इथे शनिवारी (8 जुलै) सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक थांबले.



इथे त्यांनी शेतकर्‍यांसह शेतात भाताची लागवड केली



तसंच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी देखील केली.



यावेळी त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांशी शेतीबाबत चर्चाही केली.



शिवाय राहुल यांनी शेतकऱ्यांसोबत बसून नाश्ताही केला



जीटी रोडवरील कुंडली सीमेवर पोहोचल्यावर त्यांनी शेतात जाण्याचं ठरवलं



मदिना गावात सुमारे दोन तास शेतात राबले



राहुल गांधी हे सोनीपतमधील शेतात थांबणार असल्याची माहिती कोणालाच नव्हती