काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे गांधी कुटुंबातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा मोठा नेता पहिल्यांदाच वाजपेयींच्या समाधीस्थळी पोहोचला. राहुल गांधी यांनी सोमवारी (26 डिसेंबर) 'सदैव अटल' या समाधीस्थळी जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली राहुल गांधी यांनी अनेक माजी पंतप्रधानांच्या समाधीस्थळी गेले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 'वीर भूमी' या समाधी जाऊन आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 'शक्तीस्थळ' या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 'शांतीवन' समाधीस्थळी राहुल गांधी पोहोचले आणि त्यांनी आदरांजली वाहिली भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 'विजय घाट' या समाधीस्थळी राहुल गांधी गेले आणि त्यांना नमन केलं. राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही श्रद्धांजली वाहिली. राजघाटावर जाऊन त्यांनी गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं. भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही राहुल गांधी यांनी आदरांजली अर्पण केली. 'किसान घाट'वर जात ते नतमस्तक झाले.