मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही घरात बाप्पा विराजमान झाले आहेत. गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नातवासोबत फोटोसेशन केलं. गणपतीची आरती आटोपल्यानंतर राज ठाकरेंनी नातवासोबत फोटो काढण्याची संधी सोडली नाही. त्यांनी सून आणि नातवासोबत फोटो काढून घेतले. शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या नातवाचा जन्म झाला. नातवाच्या आगमनानंतर शिवतीर्थवर पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं आगमन झालं. एरव्ही माध्यमांच्या कॅमेऱ्याला सरसावलेले राज ठाकरे यावेळी मात्र स्वत: कॅमेऱ्यामागे दिसले. मुलगी आणि सुनेचा नातवासोबत फोटो त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले. अमित आणि मिताली हे काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. त्यांनी आपल्या मुलाचं नाव किआन असं ठेवलं आहे. किआनची पहिली झलक आज पाहायला मिळाली राज ठाकरे यांनी मुलगा अमित, सून मिताली आणि नातू किआन यांचा फोटोही कॅमेऱ्यात कैद केला. नुकतेच आजोबांच्या भूमिकेत गेलेल्या राज ठाकरे यांनी मोठ्या हौसेने नातवाचे फोटो काढले