राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज पहिल्यांदाच त्यांची बहीण प्रियंका सहभागी झाल्या राहुल आणि प्रियंका यांनी समर्थकां अभिवादन केलं. या यात्रेत प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील त्यांच्यासोबत होते. सचिन पायलटही राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील बोरगाव इथून सुरु झाली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. एमपीमध्ये त्यांची यात्रा 12 दिवस चालणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत लहान मुलांचाही सहभाग दिसतो राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत हिमाचल विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती