राहुल गांधी यांनी बंगळुरु इथे कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्ससह संवाद साधला.

त्यांनी विविध कंपन्यांच्या कंत्राटी कामगार आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या ऐकून घेतल्या

यासोबतच राहुल गांधींनी या कामगारांसोबत मसाला डोसा आणि कॉफीच्या नाश्ताचाही आनंद लुटला.

बेरोजगारीमुळे आपल्याला कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

तसंच त्यांनी कर्मचाऱ्यांशी खेळाविषयी देखील चर्चा केली आणि

त्यांना त्यांच्या आवडत्या फुटबॉल खेळाडूंबद्दल विचारलं. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि डंझो सारख्या फूड

कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्स बंगळुरुमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत जेवण करताना दिसले.

यानंतर राहुल गांधी यांनी बंगळुरुमधील त्यांच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी दुचाकीचा वापर केला.

दुसरीकडे, भाजपने राहुल गांधींच्या बंगळुरुमधील रोड शो आणि सभांची खिल्ली उडवली.

सर्वाधिक अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागात राहुल गांधींनी रोड शो घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे.