उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे
यासाठी 2004 पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात
निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली
त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावांच्या यादीचा वापर करण्यात आला.
या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली.
इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांनी सुचवलेली नावे 13 रकान्यांमध्ये मांडण्यात आली आहेत.
नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एका पाठोपाठ एक नाव देण्यात येईल.
13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की,
दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येतील.