येत्या 48 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण होणार असून त्यामुळे मोचा चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
याचा परिणाम पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांवर होणार असून त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आला.
दरम्यान, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी या संबंधित एक बैठक घेऊन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
येत्या 48 तासांत या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर 'मोचा' चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे.
हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
IMD नुसार पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.