काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे सोमवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते. राहुल गांधी यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली. राहुल गांधी सुवर्णंमदिरात हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) यांच्यापुढे नतमस्तक झाले. यानंतर ते लंगरमध्ये सहभागी झाले एवढच नाही तर त्यांनी गुरुद्वारामधे सेवाही केली.. पंजाबमधील अमृतसर येथील हरीमंदिर साहिब (दरबार साहिब) म्हणजेच सुवर्णमंदिर हे शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे राहुल गांधी यांचा हा खासगी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी डोक्यावर निळ्या रंगाचा कपडा बांधला होता. सुवर्णमंदिरात नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी लंगर हॉलमध्ये भांडी घासत 'सेवा'ही केली यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याचे फोटो काँग्रेसने सोशल माध्यमांवर शेअर केले आहेत.